Thu. Jul 18th, 2019

ऑस्ट्रेलियामध्ये पन्नास डॉलरच्या नोटावर ‘ही’ मोठी चूक

0Shares

सोशल मीडियावर काही चुकीचं पोस्ट केल्यावर नेटीझन्स त्वरीत  मीम, ट्रोल करण्यात सुरुवात करतात. मात्र ऑस्ट्रेलियामध्ये पन्नास डॉलरच्या नोटांवर चक्क टायपो एरर आढळून आला आहे. ‘ट्रिपल एम’ या  रेडिओ स्टेशनने प्रसारित केलेल्या वृत्ताला दुजोरा देण्यासाठी श्रोत्याने पन्नास डॉलरवरील नोटांवर असलेल्या टायपो एररचा फोटो आपल्या ईन्सटाग्राम अकाऊंटवर फोटो प्रसिद्ध करण्यात आला आहे. हा फोटो लोकांनी प्रचंड व्हायरल केला असून ऑस्ट्रेलियन रिझर्व्ह बॅंकेने सुद्धा या टायपो एररची दखल घेतली आहे.

नेमकी चूक काय ?

सध्या सोशल मीडियावर ऑस्ट्रेलियन पन्नास डॉलरचे फोटो व्हायरल होत आहे.

या नोटांमध्ये टायपो एरर असल्याचे दिसून येत आहे.

नोटांवर बारीक अक्षरात लिहिलेल्या मजकुरात स्पेलिंगमध्ये चूक असल्याचे आढळले आहे.

यामध्ये Responsibilityच्या एवजी Responsibilty अशी स्पेलिंग तीन वेळा लिहिलेली आहे.

विशेष म्हणजे ऑस्ट्रेलियामध्ये पन्नास डॉलरच्या नोटा जास्त प्रमाणात चलनात आहे.

या नोटा ऑक्टोबर 2018 साली चलनात आल्या होत्या.

या नोटांवर एडिथ कोवन यांचा फोटो असून 1921 ते 1924 पर्यंत ऑस्ट्रेलियन संसदेच्या प्रथम महिला होत्या.

पन्नास डॉलरच्या नोटांवर त्यांचा फोटो असून त्यांनी दिलेल्या भाषणातील काही ओळी नोटांवर छापण्यात आल्या आहेत.

याच भाषणांच्या मजकुरात टायपो एरर झाला आहे.

Responsibility या शब्दाची स्पेलिंग चुकीची लिहिलेली आहे.

Responsibilty अशी स्पेलिंग तीन ठिकाणी लिहिण्यात आली आहे.

ऑस्ट्रेलियन रिझर्व्ह बॅंकेने सुद्धा या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

 

 

 

 

 

 

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *