Sun. Sep 19th, 2021

#AusVsInd : गेल्या 15 वर्षांतला सर्वांत दारूण पराभव, विराट म्हणतो ‘ही’ झाली चूक

ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंडिया मॅचमध्ये टीम इंडियाला (Team India) पराभवाचा धक्का बसला. ऑस्ट्रेलियाने तब्बल 10 गडी राखून टीम इंडियावर दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयामुळे ऑस्ट्रेलियाने 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

ऑस्ट्रेलियाने (Team Australia) प्रथम टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय घेतला. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियासमोर 256 धावांचं आव्हान उभं केलं. हे आव्हान ऑस्ट्रेलियाने अवघ्या 37.4 षटकांतच पूर्ण केलं. या मालिकेत ऑस्ट्रेलियाने 1-0 अशी आघाडी घेतली आहे. वॉर्नरच्या नाबाद 128 आणि फिंचच्या नाबाद 110 धावांच्या खेळीने भारतीय संघाचा दारूण पराभव केला.

विराट काय म्हणाला?

या सामन्यातील टीम इंडियाचा (Team India) पराभव हा गेल्या 15 वर्षांतील सर्वांत दारूण पराभव आहे.

या पराभवाचं कारण सांगताना कॅप्टन विराट कोहलीने (Virat Kohli) आपला चौथ्या नंबरवर खेळण्याचा निर्णय चुकल्याचं मान्य केलं. यापुढे अशी चूक होऊ न देण्याची खबरदारी आपण घेऊ असं त्याने म्हटलंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *