Sat. Sep 21st, 2019

रिक्षाचालक आणि नागरिकांनी श्रमदान करून स्वखर्चाने बुजवले रस्त्यावरील खड्डे!

0Shares

कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या अंतर्गत डोंबिवली पश्चिममधील रस्ते खड्डेमय झाले आहेत. डोंबिवली बावन्न चाळ, गणेश नगर चौक, राजु नगर येथे खड्ड्यामुळे वाहनचालक पडणं, अपघात होणं हे प्रकार सुरूच आहेत. तर रिक्षा चालक कंबर आणि खांदेदुखीच्या त्रासाने त्रस्त झाले आहेत. बावन्न चाळ ते गणेश नगर येथील 25 रिक्षा चालकांनी आणि प्रवाशांनी पदरचे पैसे काढून खड्डे बुजवायला घेतले आहेत.

गर्भवती महिला, लहान मुले, वृद्ध यांना घेऊन जात असताना खूप त्रास सहन करावा लागतो.

वारंवार नगरसेवक तसेच पालिका अधिकाऱ्यांना पत्र देऊनही निवेदनाला केराची टोपली दाखवली जाते.

पर्यायी लोकांनीच आता 100 ते 150 रुपये तुटलेल्या लाद्या, विटा, कपची वाळू सिमेंट यांचं मिश्रण करून रस्ते बुजवायला घेतले.

प्रशासनाला आणि सत्ताधाऱ्यांना जाग यावी याकरिता हा मार्ग आपण पत्कारला, असं रिक्षा चालकांचं म्हणणं आहे.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *