Sat. Jul 11th, 2020

मतिमंद विवाहितेवर बलात्कार करणाऱ्या रिक्षाचलकाला अटक

एकाच रात्री तिघांची हत्या झाल्यानंतर आता नागपुरात मतिमंद विवाहितेचं अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. या प्रकरणी धंतोली पोलिसांनी गुन्हा नोंद करून दोन आरोपींना अटक केली आहे. मुख्य आरोपीचे नाव शहजाद शेख असून सहआरोपी मोहम्मद जावेद अन्सारी आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित महिला ही काही प्रमाणात मतिमंद आहे.

पीडिता 20 ऑगस्टच्या संध्याकाळ पासून घरून बेपत्ता होती.

काल संध्याकाळी ती घरी परतली, तेव्हा तिच्यावर एका ऑटो चालकाने बलात्कार केल्याचं तिने सांगितलं.

पीडितेच्या कुटुंबायांनी धंतोली पोलीस स्टेशन गाठून या संदर्भात तक्रार दाखल केली.

पीडिता 20 ऑगस्ट च्या संध्याकाळी छत्रपती चौकातून जात असताना नरेंद्र नगर कडे जाण्यासाठी ती आरोपी ऑटो चालकाच्या ऑटोत बसली.

मात्र, आरोपी ऑटो चालक मुख्य आरोपी शहजाद शेख याने तिला निश्चित ठिकाणी न सोडता बळजबरीने उप्पलवाडी परिसरात नेलं. आरोपीने उप्पलवाडी मध्ये तिला दोन दिवस मित्राच्या घरी डांबून ठेऊन तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर काल संध्याकाळी तिला रेल्वे स्टेशन वर सोडून पळून गेले.

काल संध्याकाळी पीडिता घरी परतल्यानंतर तिने कुटुंबियांना सर्व प्रकार सांगितला आणि रात्री पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी ऑटो चालक आणि मदत करणारा त्याचा मित्र या दोघांना अटक केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *