Fri. Jun 5th, 2020

तरुणीला पाहून रिक्षाचालकाचं हस्तमैथून, महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

दिल्लीपेक्षा मुंबई ही स्त्रियांसाठी सुरक्षित असल्याचं नेहमी म्हटलं जातं. मात्र गेल्या काही काळापासून मुंबईमध्येदेखील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. मुंबईतील लिंक रोड या भागात एका 20 वर्षीय तरुणीला एका किळसवाण्या प्रसंगाचा सामना करावा लागला. एका रिक्षाचालकाने तिच्यासमोर उभं राहून हस्तमैथून करण्यास सुरूवात केली.

काय घडलं नेमकं?

1 सप्टेंबर रोजी ही तरुणी रात्री 11 च्या सुमारास चिंचोली बंदर बस स्टॉपला बसची वाट पाहत उभी होती.

तिला एकटीला पाहून मोहम्मद शकील नामक एक रिक्षाचालक रिक्षा घेऊन तिच्या जवळ आला.

आपण रिक्षेने सोडू असं म्हणत तिला रिक्षेत बसण्यासाठी आग्रह करू लागला.

मात्र तरुणीने त्याला नकार दिला. आपण बसनेच जाणार असल्याचं त्याला ठणकावून सांगितलं.

तरीही रिक्षाचालक तेथेच थांबून राहिला.

त्यानंतर तो रिक्षेबाहेर पडून तिच्याशी अश्लील चाळे करू लागला.

घाबरलेल्या मुलीने ताबडतोब आपल्या आईला कॉल करून याबद्दल सांगितलं.

रिक्षाचालक मात्र तरीही निर्लज्जपणे अश्लील चाळे करतच राहिला.

त्यानंतर रिक्षाचालकाने हद्दच केली. त्याने तिच्यासमोरच हस्तमैथून करायला सुरूवात केली.

हा प्रकार पाहून घाबरलेल्या तरीने आरडाओरडा केला.

तेव्हा रिक्षेत बसून रिक्षाचालक पळून गेला.

मुलीने आणि तिच्या आईने त्यानंतर गोरेगाव येथील बांगर नगर पोलीस स्टेशनमध्ये या रिक्षाचालकाविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी 32 वर्षीय मोहम्मद शकीलला ताब्यात घेतलंय.

मात्र या घटनेमुळे रात्री अपरात्री कामानिमित्त बाहेर असणाऱ्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर असल्याचं पुन्हा दिसून आलंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *