Fri. Apr 16th, 2021

गेल्या 8 वर्षांत प्रथमच यंदा वाहनखरेदीत 17 टक्क्यांची घट!

देशाच्या ऑटोमोबाइल क्षेत्रात कार, मोटरसायकल विक्रीमध्ये घट झाल्याचं चित्र आहे. गेल्या 8 वर्षातली सर्वात कमी वाहन विक्रीची नोंद या वर्षी करण्यात आली. 2019 ला वाहनांच्या विक्रीमध्ये 17 टक्यांनी घट झाल्याची नोंद झाली आहे. या वर्षी एप्रिल महिन्यात केवळ 2 लाख 47,541 कार विकल्या गेल्या. तर गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात एकुण 2 लाख 98,504 कार विक्रीची नोंद झाली होती. SUV कार सेगमेंटमध्येही 7 टक्क्यांची घट झाली आहे.

स्कूटर्सच्या विक्रीत 26 टक्के तर मोटसायकल विक्री 12 टक्क्यांनी थंडावल्याचं चित्र आहे. मारुती सुजुकी, हुंडाई, महिन्द्रा एंड महिन्द्रा आणि टोयोटा कंपनीच्या गाड्यांमध्ये मागणी थंडावली आहे.

का झालीये ही घट?

2019 मध्ये कार्बन उत्सर्जनाचे नवे नियम बीएस-६ लागू होणार आहे. त्यामुळे कार खरेदीसाठी ग्राहक थांबले आहेत.

शिवाय रोखीची कमी आणि कार विम्याची वाढती रक्कम हा सुध्दा एक फॅक्टर आहे असं  ऑटोमोबाईल तज्ज्ञांच म्हणणं आहे.

2019ला वाहन विक्रीमध्ये 17 टक्क्यांनी घट

2,47, 541 कार विक्री

गेल्या एप्रिलमध्ये 2,98,504 कार विकल्या

SUV सेगमेंटमध्ये 7 टक्क्याची घट

मारुती सुझुकी, हुंडाई, महिन्द्रा एंड महिन्द्रा आणि टोयोटा कंपनीच्या गाड्यांची मागणीत घट

मोटरसायकल खरेदीदारांनी फिरवली पाठ

2019 मध्ये मोटरसायकल विक्रीत 11.81 टक्के घट

या वर्षी 10 लाख 84 हजार 811 मोटरसायकल विकल्या

2018 मध्ये १2 लाख 30 हजार 046 मोटरसायकल विकल्या

स्कूटर्सच्या विक्रीत 26 टक्के कमी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *