Fri. Sep 17th, 2021

Google वर Thanos टाइप तर करा … मग पाहा जादू

स्वत:ची कंपनी डबघाईला आल्यावर किमान पैशांच्या जोरावर मार्व्हलचे सर्वेसर्वा ‘स्टॅन ली’ यांनी वयाच्या 85व्या वर्षी ‘आयर्नमॅन’ या कॅरेक्टरला जन्म दिला. याच संकल्पनेतून तयार झालेल्या सिनेमाला प्रचंड यश मिळालं. या सुपरहिरोपटाची सध्याच्या तरूणाईमध्ये इतकी क्रेझ आहे की, त्याचे जवळपास २१ सिरीज आत्तापर्यंत प्रदर्शित झाले आहेत, दर नवीन सिरीजमध्ये प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचते. २००८ पासून सुरू झालेला हा सुपरहिरोपटांचा प्रवास आता आज ‘Avengers Endgame’ वर येऊन ठेपला आहे.

Avengers Endgame साठी google ची नवी गंमत –

काय आहे खरी गंमत ?

Google वर Thanos असं सर्च करा.

सर्च केल्यानंतर तुम्हाला कम्प्यूटरच्या उजव्या बाजूला Stone-studded gauntlet म्हणजेच Thanos चा हात दिसेल.

त्या हातावर क्लिक केल्यानंतर अगदी चित्रपटातील Thanos सारखे आपोआप अदृश्य होऊन जाते.

पुन्हा त्या हातावर क्लिक केल्यानंतर अदृश्य झालेले search engines पुन्हा दिसायला लागतात.

त्यामुळे चित्रपटासारखेच google ने मजेदार effect दिला आहे.

पहिल्याच दिवशी प्रेक्षकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद –

सर्वात पहिला चित्रपट Iron Man हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला.

खरी सुरूवात ही ‘Iron Man 2’ पासून या सिरीजला झाली.

त्यानंतर त्याचे आत्तापर्यंत जवळपास २१ भाग प्रदर्शित झाले आहेत.

या सिरीजनी लोकांना प्रचंड वेड लावले आहेत.

आता याच सिरीजचा आज शेवटचा भाग प्रदर्शित झाला आहे.

चाहत्यांच्या आवडीच्या सुपरहिरोजच्या Thanos विरूद्धची लढाई या शेवटच्या भागामध्ये थंडावणार आहे.

या भागामध्ये दोन सुपरहिरो मरण पावतात, हे चाहत्यांना चटका लावून जाणारे आहे.

Avengers Endgameचे दिग्दर्शन ‘अँथोनी रूसो’ व ‘जो रूसो’ या दोघा भावांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *