Tue. May 11th, 2021

Avengers Endgameची दोन दिवसांत ‘एवढी’ कमाई

Avengers Endgame या चित्रपटासाठी प्रेक्षकांनी तुफान गर्दी केली आहे. एवढच नव्हे तर चाहत्यांनी एक महिन्यापूर्वीच तिकीट बुक केले होते. मात्र शुक्रवारी म्हणजेच २६ एप्रिल रोजी हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. Marvel ने आतापर्यंत २१ चित्रपट काढले असून Avengers Endgame हा शेवटचा भाग असल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे या चित्रपटात आपल्या आवडत्या Superheroचा मृत्यू होतो का ? असा प्रश्न चाहत्यांना पडला होता.  त्यामुळे Avengers Endgame साठी चाहत्यांनी चित्रपटागृहाबाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

‘Avengers Endgame’ या चित्रपटाची २ दिवसांत किती कमाई झाली ?

Avengers Endgame हा चित्रपट २६ एप्रिल रोजी प्रदर्शित झाला.

Marvel ने आतापर्यंत २१ चित्रपट तयार केले आहे.

Avengers Endgame मुळे प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली होती.

या चित्रपटाच्या पहिल्याच दिवशी ५० कोटींची कमाई झाली.

दुसऱ्याच दिवशी सुद्धा ५० कोटींची कमाई झाल्यामुळे Avengers Endgame चांगलाच गाजला.

दोन दिवसांत चित्रपटाने १०० कोटींच्या घरात पोहोचला आहे.

Avengers Endgame ने पहिल्या दोन दिवसांत १२४.४० कोटींची कमाई केली असल्याची माहिती ट्रेड एक्सपर्ट तरण आदर्शने दिली.

आतापर्यंत भारतात प्रदर्शित झालेल्या हॉलिवूड चित्रपटांना मागे टाकले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *