Jaimaharashtra news

नवी मुंबईत पित्यानेच केला मुलांवर गोळीबार

नवी मुंबई: नवी मुंबईतील आपल्याच मुलावर एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्याने गोळ्या झाडल्या आहेत. गोळ्या झाडणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव भगवान पाटील आहे. गोळीबारामध्ये जखमी झालेल्या मुलाचे नाव विजय पाटील असे असून तीन गोळ्या लागल्यामुळे विजयचा मृत्यू झाला आहे. विजयवर ऐरोलीतील इंद्रावती रुग्णालयात उपचार सुरु होते. तर भगवान पाटील याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

या निवृत्त पोलिसाने आपल्याजवळ असलेल्या सर्व्हीस रिव्हॉल्वर मधून स्वतःच्या विजय आणि सुजय पाटील या दोन मुलांवर गोळीबार केला. या गोळीबारात विजयला तीन गोळ्या लागल्याने त्याचा मृत्यू झाला, तर सुजयला एक गोळी छाटून गेली. या दोघांना उपचारासाठी दाखल करण्यात आल्यानंतर सुजयवर उपचार करुन त्याला सोडण्यात आले.

या घटनेनंतर रबाळे पोलिसांनी निवृत्त पोलीस अधिकारी भगवान पाटील याला ताब्यात घेतले आहे. गाडीच्या इन्शुरन्स करण्यावरुन झालेल्या वादातून हा प्रकार घडल्याचे पोलिसांनी सांगितले.

Exit mobile version