Thu. Jul 2nd, 2020

ज्येष्ठ साहित्यिक आणि विचारवंत अविनाश डोळस यांचं निधन

जेष्ठ साहित्यिक आणि विचारवंत अविनाश डोळस यांचं पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने औरंगाबादेत निधन झालं. वयाच्या 67 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आंबेडकरी चळवळीतील अग्रणी कार्यकर्ते, नेते, विचारवंत, प्रख्यात साहित्यिक अशी त्यांची ओळख होती.

विद्यार्थी दशेपासून विविध जनआंदोलनाच्या माध्यमातून परिवर्तन चळवळीत कार्य केल्याने साहित्य, शिक्षण, परिवर्तन चळवळ, राजकारण या विविध क्षेत्रामध्ये त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला.

अविनाश डोळस यांनी राज्य सरकारच्या डॉ. आंबेडकर चरित्र, साहित्य, साधने आणि प्रकाशन समितीचे सदस्य सचिव म्हणून काम पाहिले आहे. अविनाश डोळस हे अलिकडे निर्माण झालेल्या भारिप आणि एमआयएम वंचित आघाडीचे प्रमुख मार्गदर्शक होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *