Wed. Oct 5th, 2022

‘पालिकेकडून राणेंच्या बंगल्यावर कारवाई करण्यास टाळाटाळ’ – संतोष दौंडकर

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जुहू येथील अधीश बंगल्याच्या अनधिकृत बांधकामासाठी महानगरपालिकेने नोटीस बजावली आहे. तर काल मुंबई पालिकेच्या अधिकाऱ्यांनी अधीश बंगल्याची कसून चौकशी केली. त्यामुळे आता लवकरच राणे यांच्या अधीश बंगल्याचा तपासणी अहवाल सादर होणार आहे. दरम्यान, आरटीआय कार्यकर्ते संतोष दौंडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

महानगरपालिकेकडून नारायण राणेंच्या बंगल्यावर कारवाई करण्यास टाळाटाळ होत असल्याचा दावा, आरटीआय कार्यकर्ते संतोष दौंडकर यांनी केला आहे. संतोष दौंडकर म्हणाले की, महानगरपालिका नारायण राणेंच्या अधीश बंगल्यावर कारवाई करण्यास टाळाटाळ करत आहे. तसेच सीआरझेडच्या उल्लंघनावर पर्यावरण मंत्रालयाने अद्याप काहीही कारवाई केलेली नाही. गेल्या ६ वर्षापासून आम्ही राणेंच्या अधीश बंगल्याच्या अनधिकृत बंगल्याचा मुद्दा मांडत आहोत. आणि जोवर कारवाई होत नाही, तोवर आमचे प्रयत्न सुरूच राहणार असल्याचे संतोष दौंडकर यांनी सांगितले आहे.

२०१७मध्ये नारायण राणे यांच्या जुहू येथील अधीश बंगल्याबाबत महापालिकेकडे तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीमध्ये बंगल्याच्या बांधकामामुळे सीआरझेडच्या नियमांचे उल्लंघन करण्यात आले असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे बंगल्याची तपासणी आणि मोजमाप करण्यासाठी मुंबई पालिकेने नारायण राणेंना नोटीस पाठवली आहे. काल मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी नारायण राणे यांच्या बंगल्याची दोन तास कसून चौकशी केली. मात्र, अद्याप बंगल्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.