Wed. Aug 10th, 2022

कोरोनाच्या अफवांसंदर्भात मत्स्य व पशू विद्यापीठाकडून जनजागृती

जगभरात कोरोना व्हायरसची दहशत आहे. मात्र त्या विषयी सोशल मीडियावर अफवासुद्धा मोठ्या प्रमाणात पसरत आहेत. पोल्ट्री फार्म व्यावसायिकांचा व्यवसाय अर्ध्यावर आला आहे. मात्र आता पशु आणि मत्स्य विद्यापीठ यांच्या मदतीला धावून आलं आहे. चिकनमुळे कोरोना होत नाही याची जागृती करणार आहे.

ज्या कोरोना वायरसने जगभरात दहशत माजविली आहे, त्याच्याबद्दल सोशल मीडियावर अनेक अफवा पसरल्या आहेत.

चिकन खाल्यामुळे कोरोना होतो, ही मोठी अफवा सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरली.

त्यामुळे पोल्ट्री फार्म व्यावसायिकांना मोठा तोटा सहन करावा लागतोय.

त्यांचा व्यवसाय अर्ध्यावर आल्याने त्यांना स्वस्तात कोंबड्यांची विक्री करावी लागत असल्याचं पोल्ट्री फार्म असोशिएशनचे अध्यक्ष राजा दुधबडे यांनी सांगितलं.

कोरोना व्हायरसची दहशत जगभरात असल्याने नागरिकसुद्धा याला घाबरले आहे.

कोंबड्यांमुळे हा रोग होऊ शकतो या अफवेमुळे अर्ध्यापेक्षा जास्त लोकांनी चिकन खाणं टाळलं असल्याचं या उद्योगात झालेल्या घाट्यावरून दिसून येतं.

जी कोंबडी 80 रुपयाला विकली जायची ती आता 50 रुपयाला विकावी लागत आहे.

विदर्भाचा विचार केला तर 30 लाख टनांवर होणारी विक्री आता 2 लाख टनांवर आली.

यामुळे त्यांनी मत्स्य व पशु विद्यापीठाकडे धाव घेतली. आता मत्स्य विद्यापीठ याविषयी जागृती करणार आहे.

प्रत्येक महाविद्यालयामार्फत कोंबड्यामुळे कोरोना होत नाही हे लोकांपर्यंत पोहोचवलं जाणार आहे.

कोरोना वायरस अजून तरी भारतात आलेला नाही. मात्र त्याच्या नावाने मोठ्या अफवा पसरत आहे आणि त्याचे परिणाम सुद्धा पाहायला मिळत आहे. या सगळ्या गोष्टीची काळजी घेणं योग्य असलं तरी अफवांमुळे होणारे परिणाम टाळण्याची गरज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.