महाराष्ट्र भाजपाचे उपाध्यक्ष माधव भांडारी लिखित ‘अयोध्या’ पुस्तकाचे प्रकाशन
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन…

भाजपा चे ज्येष्ठ नेते , प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी लिहिलेल्या अयोध्या या पुस्तकाचे प्रकाशन माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भाजप मुंबई प्रदेश कार्यालयात होत आहे. या कार्यक्रमाला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी मंत्री आशीष शेलार उपस्थितीत असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुंबई भाजपा अध्यक्ष आ. मंगलप्रभात लोढा आहेत.अयोध्या येथे राममंदिर उभारणीसाठी विश्व हिंदू परिषद व अन्य संघटनांनी दिलेल्या लढ्याचा तसेच त्यापूर्वी रामजन्मभूमी मुक्तीसाठी झालेल्या संघर्षाचा अयोध्येच्या प्राचीन इतिहासाचा आढावा या पुस्तकात घेण्यात आला आहे.