Sat. Apr 20th, 2019

अयोध्येत साजरा झालेल्या दीपोत्सवाचं गिनीज वर्ल्ड रेकाॅर्ड

0Shares

दिवाळीच्या दिवशी अयोध्येत एक भव्य समारंभ आयोजित केला होता. जवळपास 3 लाख 01 हजार आणि 152 दिवे लावल्याने अयोध्येने जागतिक रेकॉर्ड तयार बनवला आहे. याशिवाय, अयोध्या दीपोत्सव 2018 ची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे. सरयू नदीच्या काठावर भगवान राम आणि भगवान हनुमानाची मूर्तीही स्थापित केली आहे.

तसेच मुख्य कार्यक्रमाच्या ठिकाणी जवळपास एक भव्य दरवाजा बांधण्यात आला आहे.तर जवळील नदी घाटाच्या परिसरातील मंदिरे रंगीत दिव्यांनी सजावण्यात आल्या असून घाटाच्या पायऱ्यांवर लाखो दिवे लावले होते. या लखलखत्या दिव्यांनी अयोध्यानगरी चमकू लागली होती.

ayodhyalamps.jpg

या प्रसंगी दक्षिण कोरियाचे पहिले लेडी किम जंग-सुक आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हेही उपस्थित होते. त्यांच्या स्वागतासाठी शहराला शुशोभित केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *