Mon. Mar 30th, 2020

अयोध्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

अयोध्येतील रामजन्मभूमी- बाबरी मशीद प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी महत्त्वपूर्ण निर्णय दिला. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात दाखल झालेल्या 20 हस्तक्षेप याचिका फेटाळून लावल्या. याचिकाकर्त्यांमध्ये सुब्रमण्यम स्वामी, श्याम बेनेगल, तिस्ता सेटलवाड, अपर्णा सेन यांचा देखील समावेश आहे.

या खटल्यात निर्मोही आखाडा, रामलल्ला आणि सुन्नी वक्फ मंडळ हे तीन पक्षकार असतील. अयोध्याप्रकरणात सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर सुनावणी झाली. यात न्या. अशोक भूषण, न्या. एस अब्दुल नाझीर यांचा देखील समावेश होता. सुप्रीम कोर्टात अयोध्याप्रकरणात 32 नामांकित मंडळींनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

यामध्ये अपर्णा सेन, श्याम बेनेगल, तिस्ता सेटलवाड, अनिल धारकर या मंडळींचा समावेश होता. ‘अयोध्येतील वादग्रस्त जागेचा वापर धार्मिक कामाऐवजी सेक्युलर गोष्टींसाठी आणि समाजोपयोगी कामासाठी करावा’, अशी मागणी या मंडळींनी केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *