Jaimaharashtra news

आयुर्वेदातील पंचकर्म हे कोविडनंतर होणा-या विविध त्रासांसाठी ठरतेय वरदान!

मुंबई : कोविड१९ संसर्गानंतर अनेक रूग्णांना विविध आजारांचा सामना करावा लागत आहे. अशा रूग्णांना अशक्तपणा,श्वसनासंबंधीचा त्रास, अस्थमा, ऑस्टियोआर्थरायटिस, संधीवात, मधुमेह, पोटाच्या विकारांना सामोरे जावे लागत असल्याचे दिसून येत आहे. आयुर्वेदातील पंचकर्म उपचारप्रणालीमधीलविविध प्रकार रूग्णांसाठी कोविडनंतरच्या त्रासांना दूर करण्यासाठी वरदान ठरत असून आता या रूग्णांना वेदिक्युअरने घरपोच सुविधा उपलब्ध करून दिली आहे. वेदिक्युअरचे तज्ञ हे सर्व कोविड प्रतिंबध नियमावलीचे काटेकोर पालन करत परिपुर्ण काळजी घेत आहेत. पंचकर्म उपचाराने आजारांना मुळापासून बरे करणे, शरीरातील दोषांचे संतुलन, उती आणि पेशींचे पोषण करून, शरीराला बळकटी देतात आणि अशा प्रकारे रोग प्रतिकारशक्ती वाढवतात. पंचकर्मपूर्व प्रक्रियेचा एक भाग म्हणून आम्ही स्नेहन (औषधी तेलाची शरीर मालिश) आणि स्वेदन (वनस्पती औषधींची वाफ) प्रदान करतो तसेच वमन, विरेचन, बस्ती, नस्य हा पंचकर्म प्रक्रियेचा एक भाग आहे. त्याचा रोगांनुसार इतर पंचकर्म उपचारांसह घरच्या घरी एक्युप्रेशर, एक्यूपंक्चर, मोक्झा थेरपी देखील दिली जाते. या साथीच्या आजारात पंचकर्म उपचार हे पोस्ट कोविडनंतर झालेल्या शारीरीक थकव्यासाठी देखील खूप प्रभावी ठरत आहेत. कारण यामुळे फुफ्फुसात जमा झालेले विषारी द्रव्य बाहेर काढून टाकले जाते, फुफ्फुसांची क्षमता वाढते, श्वास घेणे सोपे होतेज्यामुळे शरीराला शुध्द रक्ताचा पुरवठा वाढतो. शरीराचे पोषण होते, केस गळणे कमी होते तसेच आजारपणामुळे मंदावलेली भूक वाढते. एक महिना किंवा त्याहून अधिक काळ असलेल्या एनोस्मिया (गंध कमी होणे) या त्रासावर नस्य उपचार पध्दती मदत करते. कोविडमुळे निर्माण झालेल्या पल्मोनरी एम्बोलिझम, हार्ट अटॅक इत्यादीसारख्या गुंतागूंतीच्या आजारांवर पंचकर्म उपचार मदत करतात. डाँ.समुद्रिका पाटील म्हणाल्या की, कोविडमुळे आलेला थकवा तसेच इरत आजारामधून रूग्ण लवकर पुर्ववत होण्यासाठी आम्ही संयुक्त उपचारप्रणालीचा समावेश करत थेरपी तयार केल्या असून आमचे तज्ञ डाँक्टर्स रूग्णांना टेलि कन्सल्टेशनच्या माध्यमातून सल्लामसलत करत आहेत. पंचकर्म थेरपी आणि औषधे घरपोच देत असून यामुळे रूग्णांना घरच्या घरी उपचार मिळत आहेत. यासर्वांची कोविडमुळे आलेला थकवा आणि इतर व्याधींवर मात करण्यास मदत होईल. कोविड दरम्यान दिलेल्या औषधांचा नंतर दूरगामी परिणाम दिसून येत असून त्यासाठी डिटाँक्स थेरपीचा रूग्णाला नक्कीच फायदा होईल आणि त्यामुळे रूग्ण लवकरात लवकर बरा होईल.

Exit mobile version