Sun. Aug 18th, 2019

‘हो मी तिच पण नव्या रुपात’, तहिराने शेअर केला नवा फोटो

0Shares

अभिनेता आयुष्मान खुराना याची पत्नी ताहिरा कश्यप-खुरानाला 2018ला स्टेज 0 ब्रेस्ट कॅन्सर झाल्याचे निदान झाले. ताहिराने तिच्या या आजारपणाची माहिती स्वत: सोशल मीडियावर दिली होती. त्यानंतर तहिरावर उपचार सुरु करण्यात आले. ताहिराची शेवटी किमोथेरपी 5 जानेवारीला करण्यात आली होती. ताहिराने या थेरपीपूर्वी तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. या फोटोंमध्ये ताहिरा प्रचंड खुश दिसत होती. त्यानंतर ताहिराने पुन्हा तिचे नवे फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तिने तिचे पूर्णपणे केस कापल्याचे दिसून येत आहे.

ताहिराने शेअर केलेल्या फोटोमध्ये ताहिरा खुश आणि आनंदी दिसत असून तिने मुंडण केल्याचे दिसून येत आहे. किमोथेरपीमध्ये रुग्णाला त्याचे केस गमवावे लागतात. थेरपी सुरु असताना रुग्णाचे केस गळत असतात. त्यामुळे ही थेरपी करत असताना ताहिरालाही या प्रसंगाला सामोरे जावे लागले. मात्र केस पूर्णपणे कापल्यानंतरही मी पूर्वीसारखीच खूश आणि आनंदी आहे, असे ताहिराने शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

मी ताहिरा कश्यप. हो तिच पूर्वीची ताहिरा, पण नव्या अंदाजात, नव्या रुपात. सततच्या थेरपी आणि त्याच त्याच डेली रुटीनमुळे कंटाळले होते. त्यामुळे हा नवा लूक केला आहे. माझा हा लूक कसा वाटतोय ते नक्की सांगा’, असे ताहिरा म्हणाली.

पुढे ती असेही म्हणाली, ‘मला माझे सगळे केस कापावे लागतील असे स्वप्नातही वाटले नव्हते. पण ते मी केले आहे. मात्र तरीही आनंदी आहे’.तर ताहिराचं हे ट्विट आयुष्मानने रिट्विट करत तिला ‘हॉटी’ असे म्हणत त्याचे प्रेम व्यक्त केले आहे. तर अभिनेत्री दीपिका पदुकोणनेही तिला ‘हॉट’ दिसत असल्याचे म्हटले आहे.

दरम्यान, ताहिरा कॅन्सरशी लढत असतानादेखील तिने तिच्या आगामी सिनेमाची तयारी सुरु केली आहे. सिनेमाच्या चित्रीकरणामध्ये विलंब होऊ नये यासाठी ताहिरा प्रयत्न करत असल्याचे पाहायला मिळत आहे

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *