Wed. May 12th, 2021

‘अंधाधून’ या चित्रपटात उत्तम कामाबद्दल लतादीदीकडून आयुष्मान खुरानाचं कौतुक

लतादीदीच्या कौतुकाने आयुष्मान गेला भारावून…

‘अंधाधून’ या चित्रपटात केलेल्या कामाबद्दल आयुष्मान खुरानाचं सोशल मीडियावर फार कौतुक होत होतं. मात्र सध्याच्या घडीला यात आणखी एका व्यक्तीचा भर पडला आहे. गानसम्राज्ञी लतादीदींनी यांनी आयुष्यमान याचं भरभरून कौतुक केलं आहे.

आयुष्यमानचा २०१८ प्रदर्शित झालेला चित्रपट प्रेक्षकांच्या फार पसंतीला पडला होता. या चित्रपटात आयुष्मान हा एका आंधळ्या तरुणाची भूमिका साकरताना रूपेरी पडद्यावर झळकला होता.

लतादीदींनी नुकताचं हा चित्रपट बघितला आयुष्मानच्या अभिनयाने लतादीदीने कौतुक करून त्याला जणू कामाची पोचपावतीच दिली आहे. लतादीदीने एक ट्विट करून आयुष्मानच्या कामाचं कौतुकही केलं आणि म्हटलं की, ‘मी तुझा आज चित्रपट बघितला तर तू खुप छान काम केलंस यात तू जी गाणी गायली ती सुद्धा मला आवडली. भविष्यातमध्ये असंच तला यश लाभो यासाठी माझ्याकडून शुभेच्छा असा संदेश लतादीदींनी आयुष्मानसाठी लिहिला आहे.

लतादीदीच्या कौतुकाने आयुष्मानही भारावून गेला त्यानंतर आयुष्माने रिट्वट करत लिहलं की, तुमच्या तोंडून कौतुक ऐकण्यासाठीच कदाचित मी अधिक मेहनत घेतली असेल’ असं म्हणत आयुष्माननंही लतादीदींचे आभार मानले आहेत.

लतादीदीने यापूर्वा देखील आयुष्मानचे कौतुक केलं होतं. त्यांनी एका मुलाखती दरम्यान म्हटलं होतं की, आयुष्यमान संगीताची चांगली समज असून जितका मेहनत तो त्याच्या अभिनयासाठी घेतो तितकी मेहनत त्याने संगीतात करावी आणि त्यानं संगीताची आराधना करावी त्याला तो चांगली प्रगती करेल असा विश्वास लतादीदीनं आयुष्मानवर दाखवत म्हटलं होत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *