Sat. Jul 31st, 2021

सेल्फी काढताना समुद्रात पडून पर्यटकाचा मृत्यू

पॅरासिलिंगला गेलेल्या पर्यटकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना दांडी समुद्रकिनारी घडली आहे. दुपारी साडे तीनच्या सुमारास ही घटना घडली.

अझर मनझर अन्सारी (35) असे मृत तरुणाचे नाव आहे.

अन्सारी दांपत्य आज दांडी येथे समुद्रकिनारी वॉटरस्पोर्ट्सचा आनंद घेण्यासाठी आले होते. यावेळी अझर पॅरासिलिंग करण्यासाठी स्पीड बोटीवर गेला.

यावेळी पॅरासिलिंग करताना बोट चालकाने बोटीचा वेग वाढवला.

याच वेळी अझर सेल्फी काढत होता. पण अचानक वाढलेल्या वेगामुळे अझरचा तोल गेला. तोल गेल्याने अझर बोटीवर आपटून समुद्रात पडल्याची माहिती मिळत आहे.

या घटनेनंतर पर्यटन व्यावसायिकांनी अझरला स्थानिक ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचारापूर्वीच अझरचा मृत्यू झाला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

या सर्वप्रकाराची माहिती मिळताच स्थानिक बंदर निरिक्षकांनी कर्मचाऱ्यांसह ग्रामीण रुग्णालयात जाऊन घटनेची माहिती घेतली.

सदर प्रकरणाची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे.

महिन्याभरातील अशा प्रकारची ही पाचवी घटना आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पर्यटकांच्या सुरक्षचेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

दरम्यान मृत्यू झालेला तरुण मुंबईतील साकीनाक्यातील मोहली व्हिलेज परिसरातील रहिवाशी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *