Fri. Jun 18th, 2021

कोरोनाग्रस्तांसाठी अझीम प्रेमजी यांची ‘इतक्या’ कोटींची मदत

कोरोनाची आपत्ती लक्षात घेऊन आज सरकारच्या मदतीसाठी अनेक सेलिब्रिटी, उद्योगपती यांनी पुढाकार घेतला आहे. ‘टाटां’तर्फे १५०० कोटी रुपयांची मदत दिली गेली आहे. त्यांच्यापाठोपाठ अंबानींनीही कोट्यवधी रुपयांची मदत केली आहे. ‘विप्रो’चे अझीम प्रेमजी हे देखील आपल्या दानशूरपणासाठी प्रसिद्ध आहेत. प्रेमजी यांनी कोरोनाविरोधातील वढाईसाठी ११२५ कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा केली आहे.

विप्रोकडून निवेदन जारी करण्यात आलं आहे. या निवेदनानुसार विप्रो लिमिटेड, विप्रो एंटरप्रायजेस आणि अझीम प्रेमजी फाउंडेशन यांनी मिळून ११२५ कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. विप्रे लिमिटेड १०० कोटी रुपये देत आहे. विप्रो एंटरप्रायजेसतर्फे २५ कोटी देण्यात येणार आहेत. सर्वाधिक निधी अझीम प्रेमजी फाऊंडेशन १ हजार कोटी रुपयांचा निधी देत आहेत.

विप्रोच्या वार्षिक CASR निधींतर्गत ही रक्कम दिली जाणार नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. हे पैसे कोरोनापीडित लोकांच्या आरोग्य सुविंधावर खर्च करण्यात येणार आहेत. १६०० कर्मचाऱ्यांच्या मदतीने हा उपक्रम राबवण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *