Fri. Sep 24th, 2021

‘बाबा का ढाबा’ फेमस करणाऱ्या यू-ट्यूबर विरोधात बाबांनी केली पोलीस ठाण्यात तक्रार

‘बाबा का ढाबा’ फेमस करणाऱ्या यूट्यूबर गौरव वासनच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

नवी दिल्ली: दक्षिण दिल्लीच्या मालवीय नगरातील ‘बाबा का ढाबा’चे  मालक कांता प्रसाद  यांचा सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. यात कोरोना संकटामुळे आणि लॉकडाऊनकाळात व्यवसाय होत नसल्यामुळे त्यांच्या कुटुंबाला अनेक संकटातून जावं लागत आहे आणि त्यांना रोज किती कष्ट घेऊन सुद्धा त्यांची काहीच कमाई होत नाही याबद्दल त्यांनी सोशल मीडियावर भावूक होऊन यूट्यूबर गौरव वासन याला सांगितलं होतं. त्यानंतर गौरव वासन याने हा व्हिडिओ व्हायरल केला.

हा व्हिडिओ व्हायरल झाल्याबरोबर बाबाच्या मदतीसाठी अनेकजण समोर आले. त्यांच्या लहानशा हॉटेलमध्ये ग्राहकांची एकच गर्दी झाली होती तर अनेकांनी बाबाना पैसे पाठवून आणि बाबाच्या ढाब्यावर जाऊन त्यांची मदत केली.

गौरव वासन याने केलेल्या प्रसाद यांच्या शेअर व्हिडिओत त्याने प्रसाद यांना मदत करण्याचे आवाहन केले होतं. त्यानंतर यूट्यूबर गौरव वासनने त्याच्या जवळच्या  व्यक्तींचे बँक डिटेल्स दिले होते, ज्यावर मदत म्हणून मोठ्या प्रमाणात पैसा पाठवण्यात आले होते.

गौरव वासनने लोकांकडून मिळालेल्या पैशाचा गैरवापर केल्याप्रकरणी 80 वर्षीय कांता प्रसाद यांनी  रविवारी मालवीय नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तर तक्रारीत प्रसाद यांनी गौरवने अनेक पैशांचे व्यवहार परस्पर केले आणि ते लपविले असाही आरोप केला आहे.  पोलीस या प्रकरणाचा तपास  करत आहेत. सध्या याप्रकरणीअद्याप कोणताही एफआयआर नोंदवण्यात आलेला नाही,’ असं पोलीस अधिकारी अतुलकुमार ठाकूर यांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *