Jaimaharashtra news

‘या’ कलाकारांसह ‘बाबा’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

बाबा चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूड अभिनेते संजय दत्त आणि पत्नी मान्यता दत्त यांचा मराठी सिनेसृष्टीतील पहिला चित्रपट लवकरच प्रेषकांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री स्पृहा जोशी आणि अभिनेता अभिजीत खांडकेकर या चित्रपटात झळकणार आहेत. या चित्रपटात स्पृहा जोशी ‘पल्लवी’ तर अभिजीत खांडकेकर ‘राजन’ अशी भूमिका साकारणार आहेत. भावनेला भाषा नसते असा संदेश या चित्रपटाच्या माध्यमातून देण्यात आला आहे.

‘बाबा’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला –

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते संजय दत्त आणि पत्नी मान्यता दत्त यांचा बाबा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

या चित्रपटात तनु वेडस मनू’ आणि ‘हिंदी मिडीयम’ फेम दीपक दोब्रीयाल प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत.

दीपक दोब्रीयाल या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी सिनेसृष्टीत पर्दापण करणार आहेत.

तसेच अभिनेत्री स्पृहा जोशी आणि अभिनेता अभिजीत खांडकेकर सुद्धा या चित्रपटात पल्लवी आणि राजन यांची भूमिका साकारणार आहेत.

या चित्रपटाचा पहिला ट्रेलर संजय दत्त यांच्या उपस्थितीत प्रदर्शित केला आहे.

त्यामुळे प्रेक्षकांना या चित्रपटाची उत्कंठा वाढली आहे.

हा चित्रपट २ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

 

 

Exit mobile version