Thu. Oct 21st, 2021

अखेर ‘पतंजली’ची जीन्स बाजारात… अंगावर घाला ‘संस्कार’ आणि ‘आस्था’

योग गुरु बाबा रामदेव यांची स्वदेशी कंपनी पतंजली आता कापड उत्पादन उद्योगामध्ये उतरली आहे. बाबा रामदेव यांनी दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर ‘पतंजली परिधान’ या नावाने आपल्या पहिल्या शोरुमचे उद्घाटन केले आहे. यावेळी दिल्लीतील नेताजी सुभाष प्लेसमध्ये आयोजित उद्घाटन कार्यक्रमात कुस्तीपटू सुशील कुमार, दिग्दर्शक मधुर भंडारकर यांच्यासह अनेक दिग्गज उपस्थित होते.

येत्या डिसेंबर महिन्यात देशात जवळपास 25 नवीन ‘पतंजली परिधान’ स्टोअर ओपन करण्यात येणार आहेत. ‘पतंजली परिधान’मध्ये भारतीय वेशभूषेसह पश्चिम पोशाख आणि इतर एक्सेसरीज उपलब्ध असणार आहेत. इथे ‘आस्था’ ब्रॅँडमध्ये स्त्रियांचे कपडे तर ‘संस्कार’ ब्रॅँडमध्ये पुरुषांचे कपडे मिळणार आहेत. दिल्लीत सुरु करण्यात आलेल्या ‘पतंजली परिधान’मध्ये जीन्स 1100 रुपयांना मिळत आहे. मात्र दिवाळीनिमित्त15 टक्कांची सवलत देण्यात आली असल्याचे बाबा रामदेव यांनी सांगितले आहे.

बाबा रामदेव यांच्या प्रवक्त्याने ट्विटरच्या माध्यातून सांगितले की, ‘पतंजली परिधान’मध्ये पुरुष, स्त्रिया, लहान मुले, डेनिम, पारंपरिक, कॅज्युअल, फॉर्मल अशा सर्व प्रकारचे 3000 कपड्यांचे प्रकार उपलब्ध आहेत. यामध्ये लिवफीट, आस्था आणि संस्कार या ब्रँडचे कपडे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच, ज्याप्रमाणे खादीने देशाच्या स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्त्व केले होते. त्याचप्रमाणे पतंजली देशात आर्थिक स्वातंत्र्य आणेल असे ट्विटमध्ये म्हटले आहे.

View image on TwitterView image on TwitterView image on TwitterView image on Twitter

Tijarawala SK@tijarawala


उद्घाटन आज!
Today Pujya @yogrishiramdev will inaugurate the showroom of men’s wear/women’s wear/kids’ wear with 3000+ varieties at Netaji Subhash Place, Del under 3 brands  @ANI pic.twitter.com/TzCaDTDdnGhttps://youtu.be/JT3cPPnqEy4 

22 people are talking about this

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *