Thu. Oct 21st, 2021

आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे रुग्णालयाबाहेर चारचाकी वाहनातच महिलेने दिला बाळाला जन्म

जय महाराष्ट्र न्यूज, दौंड

 

दौंड तालुक्यातील राहु येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे रात्री 3 वाजण्याच्या सुमारास गरोदर महिलेने चक्क प्राथमिक आरोग्य केंद्राच्या

बाहेरच चारचाकी गाडीत बाळाला जन्म दिल्याची धक्कादायक घटना घडली.

 

आरोग्य अधिकारी व सबंधित कर्मचारी कामावर नसल्याने सदर महिलेला यवत येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घ्यावे लागत आहेत.

 

राष्ट्रीय समाज पक्षाचे एकुलते एक आमदार राहुल कुल यांच्या गावातीलच हा प्रकार असल्याने शासन या प्रकारात लक्ष घालून दोषींवर काय कारवाई करणार हे पाहुणे

औत्सुक्याचे ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *