Mon. May 17th, 2021

बेबी डॉल गायिका कनिका कपूर कोरोनाग्रस्त, ‘तो’ आगाऊपणा पडला महागात

‘बेबी डॉल मै सोने दी’, ‘चिट्टिया कलाईयाँ’ यांसारखी लोकप्रिय गाणी गाणारी Bollywood ची गायिका कनिका कपूर हिने आपण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं उघड केलं आहे. Instagram वर पोस्टद्वारे तिने याबद्दल स्पष्टीकरण दिलं आहे.

विमानतळावर लपाछपी नंतर पडली महागात

15 मार्च रोजी कनिका कपूर लंडनहून परतली होती. मात्र त्यावेळी कोरोना चाचणी टाळण्यासाठी केलेले नस्ते उद्योग आता महागात पडले आहेत. विमानतळावर ग्राऊंड स्टाफशी संधान साधून वॉशरूममधून ती लपून राहिली.  

त्यानंतर रविवारी तिने लखनौला आपल्या गॅलेंट अपार्टमेंटमध्ये एक मोठी पार्टीही दिली. या पार्टीमध्ये मोठमोठे अधिकारी, नेते मंडळी इत्यादींसह सुमारे 100 लोक हजर होते.

मात्र आता आपल्याला कोरोना झाल्याचं तिने मान्य केल्यानंतर मात्र सर्वांमध्येच दहशतीचं वातावरण आहे. तिच्या अपार्टमेंटमध्ये सगळे भ्यायले आहेत. तसंच तिचे नोकर, पार्टीचे संयोजक, त्यात सामील झालेले लोक हे सर्वच आता कोरोनाच्या भीतीने घाबरले आहेत. तिच्या इमारतीतील अनेकांनी आपलं घर सोडून दुसरकडे निघून गेले आहेत. कनिका कपूर आणि तिच्या कुटुंबियांना आता Quarantine करण्यात आलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *