Wed. Jul 28th, 2021

अखेर ‘त्याची’ मृत्यूशी झुंज अपयशी

उपचारादरम्यान ईसीजी यंत्रात तांत्रिक बिघाड झाल्यानं चार महिन्यांच्या बाळाचा मृत्यू

उत्तरप्रदेशमध्ये चार महिन्यांच्या प्रिन्सला हृदयविकारावरील वैद्यकीय उपचारांसाठी परळ मधील केईएम रुग्णालयाच्या बालरोग अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलं होतं. प्रिन्सच्या उपचारादरम्यान ईसीजी यंत्रात तांत्रिक बिघाड झाल्यानं तारांनी पेट घेतला. त्यानंतर प्रिन्सच्या खाटेवरील चादरीला आग लागली.

यामध्ये प्रिन्सचा हात, खांदा, कान आणि कमरेचा भाग भाजला गेला. आगीला आटोक्यात आणल्यानंतर त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आले. हृदयाच्या ठोक्यांवर देखरेख करण्यासाठी प्रिन्सला ईसीजी यंत्र लावण्यात आले होते.

प्रिन्सच्या रक्ताभिसरणात अडथळा येत असल्यानं त्याचा हात कापण्यात आला. गेल्या दोन आठवड्यापासून प्रिन्स जगण्याचा संघर्ष करत होता. गुरूवारी त्यांची प्रकृती फार खालावली. प्रिन्सचा रक्तदाब खूप कमी झाल्यानं त्याला हृद्य विकाराचा झटका आला आणि यातच प्रिन्सचा मृत्यू झाला.

प्रिन्सला ऑक्सिजनची पातळी अधिक असलेल्या क्षमतेच्या व्हेण्टिलेटरवर त्याला लावण्यात आले होते. केईएम रुग्णालयातील डॉक्टरांनी प्रिन्सला वाचविण्याचा फार प्रयत्न केला मात्र अखेर त्याची प्राणज्योत मालवली. डॉ. हेमंत देशमुख यांनी सायंकाळी याबद्दलची माहिती दिली. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पालिकेनं एक चौकशी समिती नेमली आहे. या समितीचा वैद्यकीय अहवाल अद्यापही आला नसल्याची माहीती पालिका रुग्णालयाच्या संचालक डॉ. रमेश भारमल यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *