Mon. Dec 6th, 2021

विरुष्काची लेक वामिका झाली 6 महिन्याची पार्कमध्ये झालं सेलिब्रेशन

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि तिचा नवरा क्रिकेटपटू विराट कोहली हे आपल्या लेकीला सोशल मीडियापासून दूर ठेवतात. विरुष्काची लेक वामिका ही 6 महिन्याची झाली त्यामुळे त्यांनी याचं सेलिब्रेशन पार्कमध्ये केलं आहे. आता नुकतीच विराट कोहली आणि अनुष्का शर्माने काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. ज्यामध्ये हे दोघे आपल्या मुलीसोबत खेळतांना दिसत आहे. अनुष्का शर्माने हे फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करत एक पोस्ट शेअर केली आहे.

या फोटोंमध्ये अनुष्का शर्मा, वामिका आणि विराट हे तिघेही आपल्याला एकत्र धमाल करताना या फोटोत दिसत आहे. तसेच एका फोटोत अनुष्का शर्माच्या मांडीवर आपण वामिकाला पाहू शकतो. दुसर्‍या फोटोत विराट कोहली वामिकाला उचलून तिच्यासोबत खेळताना दिसत आहे. या फोटोत वामिका आणि विराटचे पाय दिसत आहे तर चौथ्या फोटोत आपल्याला एक केक दिसत आहे. हे फोटो पाहून असे दिसते की विराट आणि अनुष्का वामिकासमवेत एका पार्कमध्ये छोट्या सहलीला गेले होते सोशल मीडियावर या फोटोला फार लाईक्स मिळत आहे.

हे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना अभिनेत्रीने लिहिलं की, “तिचे एक हास्य आमचे संपूर्ण जग बदलू शकते, मला आशा आहे की आम्ही दोघेही या प्रेमावर खरे ठरू, जितक्या प्रेमाने तू आम्हाला पाहतेस, चिमुकली परी.. आमच्या तिघांनाही 6 महिन्यांच्या शुभेच्छा.” विराट आणि अनुष्काच्या चाहत्यांना हे फोटो खूप पसंत पडत आहेत. एवढेच नव्हे तर, या दोघांचेही सर्व चाहते त्यांचे अभिनंदन करत आहेत. ही छायाचित्रे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत येत आहेत.

अनुष्काने सांगितलं की विराटने बाळाला सोशल मीडियापासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही याबाबत खूप विचार केला. आम्ही आमचं बाळ वाढताना लोकांना दाखवण्याची इच्छा नाही. आम्ही आमच्या मुलांना सोशल मीडियात अडकवू इच्छित नाही. पुढे जाऊन त्याचा निर्णय मुलं घेतील. आजकाल मोठ्यांनाच सोशल मीडिया हँडल करण्यात इतकी समस्या येते. हे थोडं कठीण असेल पण आम्ही हे फॉलो करु.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *