Fri. Oct 18th, 2019

पीकविम्याच्या मुद्यावरून बच्चू कडू आक्रमक; शिवसेनेवर टीका

पीकविमाच्या मुद्यावरून शिवसेनेेने इशारा मोर्चा काढला होता. शेतकऱ्यांना पीक विमा कंपनी आणि बॅंकांनी पीकाविम्याचे पैसे त्वरीत द्यावे असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला होता. मात्र शेतकऱ्यांना त्यांचे पीकविम्याचे पैसे मिळाले नसल्याने शेतकरी चिंतेत आला आहे. यावर आमदार बच्चू कडू यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. पीकविम्याच्या मुद्यावरून मोर्चा काढतात मात्र शिवसेनेचे कॅबिनेट मंत्री झोपा काढतात का ? असा सवाल उपस्थित केला आहे.

काय म्हणाले बच्चू कडू ?

आमदार बच्चू कडू यांनी शिवसेनेवर पीकाविम्याच्या मुद्यावरून घणाघाती टीका केली आहे.

राज्यतील शेतकऱ्यांना पीकाविम्याचे पैसे मिळालेले नाही.

पीकविम्यामध्ये कृषीमंत्र्यांना किती पैसे मिळाले, अधिकाऱ्यांना किती पैसे मिळाले हे तपासणे गरजेचे असल्याचे बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.

आदित्य ठाकरे यांच्यावरही बच्चू कडू यांनी टीका केली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *