Sun. Jan 16th, 2022

अमरावतीत बच्चू कडू यांचे ताली थाली बजाव आंदोलन

कोरोना काळात शेतकरी अनेक आर्थिक संकटात सापडला आहे. तसेच नैसर्गिक आपत्ती आणि बाजारातील चढ- उतारामुळे राज्यातील शेतकरी हा चिंताग्रस्त झाला आहे. शिवाय वादळ आणि पावसामुळे शेतकऱ्यांचे फार नुकसान झाले आहे. एकीकडे आधीच शेतकरी संकटात आहे. त्यात लॉकडाऊनमूळे शेतकरीं पूरता पिचला असतानाच आता रासायनिक खतांच्या किंमती प्रचंड वाढल्याने शेतकऱ्यांसमोर नवीन संकट आलं आहे त्यामुळे केंद्र सरकारच्या खत भाववाढीच्या निषेधार्थ राज्यमंत्री बच्चू कडू यांनी कार्यकर्त्यांसमवेत अमरावती येथील राजकमल चौकात ताली बजाव-थाळी बजाव आंदोलन केले. या आंदोलनामार्फत बच्चू कडू यांनी रासायनिक खतांचे वाढलेले भाव तातडीने कमी करण्याची मागणी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केली.

केंद्राने रासायनिक खताची दरवाढ मागे घेतली आहे. तर भारतात ४२ लाख टनाची आवश्यकता असुन ४५ लाख टन तुर उपलब्ध आहे. आवश्यकतेपेक्षा २ लाख टन तुर उपलब्ध असताना केंद्र सरकारने ६ लाख टन तुर आयात कशासाठी केली? हा सवाल सुद्धा त्यांनी व्यक्त केला, तसेच तूर, मूग, उडीद या कडधान्याची आयात थांबवण्याची मागणी बच्चू कडू यांनी सरकारकडे केलेली आहे. शिवाय तुर, मुग, उडीद आयात पुर्णपणे खुली करुन धान्याचे भाव पाडण्यात येणार आहे असा आरोप बच्चू कडू यांनी केला.

काही दिवसांपूर्वीच या वर्षीच्या रासायनिक खतांचे दर घोषित करण्यात आली होती, या वाढत्या खतांच्या किंमतीमुळे शेतकऱ्यांना अधिक पैसे मोजावे लागणार होते मात्र आता शेतकऱ्याच्या हितासाठी बच्चू कडू समोर आले आहे. यापुर्वी देखील बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांची मदत केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *