Fri. Jul 30th, 2021

अफझलखान परवडला पण, हे तर त्यांचे बाप निघाले; बच्चू कडूंचं सदाभाऊ खोतांना आव्हान

 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

 

शेतकऱ्यासाठी काढलेली आसूड यात्राही सांगलीत दाखल झाली असताना आमदार बच्चू कडू यांनी कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर निशाणा साधला.

 

सदाभाऊ खोतांनी लालदिव्यासहित आसूड यात्रेत यावं. जर, येता येत नसेल तर लालदिवा सोडून शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर यावं असं आव्हान आमदार बच्चू कडू यांनी सदाभाऊ खोत यांना केले.

 

तर,  हा शेतकऱ्यांचा आसूड सरकार विरोधात चालवणार असल्याचं सांगून कर्जमुक्ती न दिल्यास मंत्रालयात घुसून फटके मारु असा इशाराही कडू यांनी दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *