Sat. May 25th, 2019

आयपीएल प्रेमींसाठी बॅड न्यूज

0Shares

आयपीएल हा एखाद्या सणासारखा झाला आहे, जो वर्षातून 2 महिने येतो आणि सर्व क्रिकेटप्रेमींना खुश करून जातो. आयपीएलमुळे अनेक स्थानिक खेळाडूंना भारतीय संघामध्ये खेळण्याची संधी मिळाली आहे.

परंतु आयपीएल प्रेमींसाठी एक बॅड न्यूज आहे ती म्हणजे पुढील वर्षी होणाऱ्या क्रिकेट वर्ल्ड कपमुळे काही संघ आयपीएलला उशिरा खेळणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

तसेच आयपीएल सामना 29 एप्रिलपासून सुरु होण्याची शक्यता असून खेळांडूचा लिलाव 17 आणि 18 डिसेंबरला जयपूरमध्ये होणार आहे.तर आयपीएलचा पुढील सीझन भारतात होणार की अन्य देशांमध्ये होणार याबाबत थोडीशी शंका आहे.

त्याचप्रमाणे पुढील वर्षी देशातभरात निवडणुका असल्याने आयपीएल भारतातच होईल की द.आफ्रिका आणि युएईमध्ये हे अद्याप स्पष्ट करण्यात आलेलं नाही. तत्पूर्वी 31 मे पासून इंग्लंडमध्ये सुरू होणाऱ्या वर्ल्ड कपमुळे ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड हे संघ आयपीएलमध्ये उशिरा सामील होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *