Sat. Aug 13th, 2022

कोलाडचं ‘रिव्हर राफ्टिंग’ पसंत करणाऱ्यांसाठी दुःखद बातमी

नदीच्या पाण्यात जोरदार प्रवाहासोबत वाहत जात थ्रील अनुभवणाऱ्या पर्यटकांच्या तोंडावर कोलाड हे नाव आपसूक येतं. कारण रिव्हर राफ्टींगसाठी मुंबईजवळचं प्रसिद्ध ठिकाण म्हणजे रायगड जिल्ह्यातील कोलाड (River Rafting at Kolad). पण आता हे Thrill आवडणाऱ्या हौशी पर्यटकांसाठी एक दु:खाची बातमी आहे. कोलडच्या कुंडलिका नदीत होणारं रिव्हर राफ्टींग शासनाच्या लघुपाटबंधारे विभागाने बंद केली आहे.

लघु पाटबंधारे विभागाच्या वसुलीच्या चुकीच्या धोरणाचा फटका रिव्हर राफ्टिंग (River Rafting) व्यवसायाला बसला आहे.

पुढे येणाऱ्या ऑनलाईन टेंडर (Online Tender) पद्धती आणि कोट्यवधीच्या डिपॉझिटमुळे स्थानिक व्यवसायिक हद्दपार होतील या बेरोजगारीच्या भितीने येथील व्यवसायिक धास्तावले आहेत.

गड किल्ले, विस्तीर्ण समुद्र किनार ही रायगड जिल्ह्याची नैसर्गिक ओळख आहे.

पण टाटा पॉवरच्या (Tata Power) मुळशी धरणातून (Mulshi Dam) कुंडलिका नदीला सोडल्या जाणाऱ्या पाण्याचा वापर करत येथील स्थानिकांनी 20 वर्षांपूर्वी रिव्हर राफ्टींगचा व्यवसाय सुरू केला.

नदीची रेकी करण्यापासून ते पर्यटकांना आकर्षित करणं, सोईसुविधा देण्याचं काम करत स्थानिक बेरोजगार तरुणांनी कोलाड राफ्टींग या नावाने हा व्यवसाय विकसित केला.

या व्यवसायामुळे शासनाला कोट्यवधीचा महसूल (Revenue) मिळू लागला.

मात्र आज मुदत असतानाही वसुलीचा तगादा लावत लघु पाटबंधारे विभागाच्या कोलाड शाखेने राफ्टींग व्यवसाय बंद केल्याने येथील व्यवसायिक धास्तावले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.