Jaimaharashtra news

अल्पवयीन मुलीला मारहाण प्रकरणात हलगर्जीपणा केल्याच्या आरोपात पोलिस निरीक्षकाची बदली

जय महाराष्ट्र न्यूज, नगर

 

नगरमधील अल्पवयीन मुलीला मारहाणप्रकरणी श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक साहेबराव कडणोर यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. या प्रकरणात फिर्याद नोंदवण्यास विलंब केल्यानं त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.

 

सामुदायिक रस्त्यावरुन जायला मनाई केली म्हणून श्रीगोंद्यात गावगुंडांनी अल्पवयीन मुलीला मारहाण आणि शिवीगाळ केली होती. मुलीच्या पालकांनाही धमकी दिली होती.

Exit mobile version