Jaimaharashtra news

बदलापुरात वायुगळतीमुळे नागरिकांना श्वसनाचा त्रास

बदलापूर: बदलापुरमध्ये गुरुवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीतून वायूगळती झाल्याने नागरिकांचा श्वसनाचा त्रास सुरु झाला आहे.

पूर्व भागातील शिरगाव, आपटेवाडी, दत्तवाडी, कात्रप, गावदेवी मंदिर परिसर भागात ह्या वायूगळतीचा परिणाम झाला आहे. दारे खिडक्या बंद करूनही नागरिकांना डोळ्यांची जळजळ, श्वसनाचा त्रास, चक्कर येणे, मळमळणे असा त्रास सुरु झाला.

बदलापूर पूर्वेतील ग्लोबल इंटरमिडीएट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमधून ही वायुगळती झाली. कंपनीत जनावरांचे खाद्य बनवण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची प्रक्रिया केली जात होती. यात मेटानायट्रोबेनझाईम डीहाईड या कच्च्या तेलावर प्रक्रिया केली जात असताना मिसळल्या जाणाऱ्या सल्फरचे प्रमाण अधिक झाल्याने वायू पसरला. रात्री उशिरापर्यंत ही गळती सुरु होती, मात्र कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली आहे.

Exit mobile version