जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन : बॅडमिंटनपटू किदम्बी श्रीकांतला रौप्यपदक

भारताचा आघाडीचा बॅडमिंटनपटू किदम्बी श्रीकांतने रौप्यपद पटकावले आहे. जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत श्रीकांतने अंतिम फेरी गाठली होती. मात्र श्रीकांतला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. मात्र प्रथमच भारतीय खेळाडू किदम्बी श्रीकांत जागतिक स्पर्धेत अंतिम सामन्यात पोहचून रौप्य पदक पटकवणारा प्रथम खेळाडू ठरला आहे.
जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम सामन्यात श्रीकांतचा २१-२५, २२-२० असा पराभव झाला. श्रीकांतने अप्रतिम कामगिरी करत जागतिक बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम सामन्यापर्यंत मजल मारली होती. परंतु अंतिम सामन्यात सिंगापुरच्या लोह किन येव याने श्रीकांतला मात दिल्याने श्रीकांतचे सुवर्णपदक हुकले. त्यामुळे त्याला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.
मात्र जागतिक बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहोचणारा श्रीकांत पहिलाच खेळाडू ठरल्यामुळे श्रीकांतने इतिहास रचला होता. त्यामुळे अंतिम सामन्यात पराभूत होऊनही श्रीकांतने रौप्य पदकावर नाव कोरले आहे. भारतीय खेळाडूला प्रथमच जागतिक स्पर्धेत रौप्य पदक मिळाले आहे.