Jaimaharashtra news

इतिहासातील सर्व विक्रम मोडीत काढणार बाहुबली करणार 1000 कोटींची कमाई

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

बाहुबली-2 हा चित्रपट एक नवा इतिहास रचण्याची शक्यता आहे. पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत 146 कोटींची कमाई करणारा ‘बाहुबली-२’ हा आठवड्याभरात 1000

कोटीची विक्रमी कमाई करण्याची चिन्हे आहेत असा अंदाज  चित्रपट समीक्षक आणि थिएटर मालक वर्तवित आहेत.

 

बाहुबलीने भारताबाहेर 56 कोटींची कमाई केली आहे. तर, दिल्ली एनसीआरच्या अधिकाधिक मल्टीप्लेक्समध्ये 95 टक्के अॅडव्हान्स बुकींग झाले आहे.

 

पीव्हीआर, बिग सिनेमा, आयनॉक्स आणि व्हेव ग्रुपच्या मल्टीप्लेक्समध्ये सर्वच शो अॅडव्हान्स बुकींगमुळे हाऊसफुल्ल पाहायला मिळत आहेत. त्यामुळे बाहुबली आता इतिहास रचणार का हे

पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Exit mobile version