Fri. Aug 12th, 2022

नितेश राणेंना जामीन मंजूर

भाजप आमदार नितेश राणे यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. संतोष परब हल्ल्याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयाने नितेश राणे यांना दिलासा दिला आहे. ३० हजारांच्या जातमुचलक्यावर नितेश राणेंना जामीन मंजूर झाला आहे.

भाजप आमदार नितेश राणे यांना संतोष परब हल्ल्याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. मात्र, यादरम्यान त्यांची प्रकृती अस्वस्थ झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. अखेर आज नितेश राणेंच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली असून त्यांचा जामीन मंजूर केला आहे.

काय आहे प्रकरण?

१८ डिसेंबर रोजी संतोष परब यांच्यावर कणकवलीत हल्ला झाला होता. संतोष परब हे करंजे गावचे माजी सरपंच आहेत. जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे समर्थक करंजे गावचे माजी सरपंच संतोष परब यांच्यावर अज्ञात इनोव्हा कारमधून आलेल्या दोघांनी टोकदार चाकूने वार केल्याने परब जखमी झाले होते. याप्रकरणी संशयित आरोपी सचिन सातपुतेला दिल्लीतून अटक करण्यात आली आहे. सचिन सातपुते हा नितेश राणे यांच्या स्वाभिमानी संघटनेचा कार्यकर्ता असून परिणामी नितेश राणे यांची चौकशी सुरू करण्यात आली. दरम्यान या प्रकरणी नितेश राणे यांच्यावर कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

याप्रकरणी अटक न होण्यासाठी नितेश राणे यांनी जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज केला होता. दरम्यान, त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी अनेकदा पुढे ढकलण्यात आली असून आज अखेर नितेश राणेंना जामीन मंजूर झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.