Tue. Mar 9th, 2021

‘बालक पालक’ फेम अभिनेत्री शाश्वती पिंपळीकर अडकली लग्नबेडीत

लग्न सोहळ्याला चित्रपटसृष्टीमधील काही कलाकरांनी हजेरी लावली होती.

अनेक टीव्ही कलाकार या वर्षात लग्न करत आहे. आता यामध्येचं ‘बालक पालक’ फेम अभिनेत्री शाश्वती पिंपळीकर लग्नबंधनात अडकली आहे. शिवाय तिच्या लग्नाचे फोटो हे सोशल मीडियावर व्हायरलं झाले आहे. ‘बालक पालक’ या चित्रपटाद्धारे शाश्वती ही चर्चेत आली होती. शाश्वतीने फोटोग्राफर राजेश करमकरशी लग्न केले आहे. या लग्न सोहळ्याला चित्रपटसृष्टीमधील काही कलाकरांनी हजेरी लावली होती.

काही दिवसांपूर्वी शाश्वतीने राजेशसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत नात्याची कबूली दिली होती. शाश्वतीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीला फोटो शेअर करत लग्न केल्याची माहिती दिली आहे. शाश्वतीने आजवर अनेक मराठी मालिकांमध्ये काम केले आहे. तिने ‘बालक पालक’ चित्रपटात डॉली या नावाच्या भूमिकेत पडद्यावर झळकली होती. तिच्या या भूमिकेचे विशेष कौतुक झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *