Thu. Jan 27th, 2022

अभिनंदन यांच्या ’51 स्क्वाड्रनचा’ विशेष सन्मान

पुलवामा हल्ल्यात विंग कमांडर अभिनंदन वर्तमान यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली होती. अभिनंदन यांनी पाकिस्तानचे लढावू विमान खाली पाडले होते यानंतर संपूर्ण देशभरातून अभिनंदन यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत होता.

पुलवामा हल्ल्यात विंग कमांडर अभिनंदन वर्तमान यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली होती. अभिनंदन यांनी पाकिस्तानचे लढावू विमान खाली पाडले होते यानंतर संपूर्ण देशभरातून अभिनंदन यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत होता.नुकताच अभिनंदन यांच्या 51 स्क्वाड्रनचा विशेष सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती भारतीय हवाईदलाचे प्रमुख आर. के. एस. भदौरिया यांनी दिली आहे. याआधी पाकिस्तानचे एफ-16 हे लढावू विमान पाडल्यानंतर 51स्क्वाड्रनला प्रशस्तीपत्र देण्यात आले होते.

कमांडिंग ऑफिसर ग्रुप कॅप्टन सतीश पवार हे 51 स्क्वाड्रनचा हा सन्मान स्वीकारणार असल्याचे सांगितले आहे. या व्यतिरिक्त बालाकोट एअरस्ट्राइक यशस्वीपणे राबवणाऱ्या 9 स्क्वाड्रन, तसेच स्क्वाड्रनच्या मिराज 2000 या लढावू विमानांनी ‘ऑपरेशन बंदर’ यशस्वी केल्याबद्दल, आणि बालाकोट एअरस्ट्राइक मधील क्वाड्रन लीडर मिंटी अग्रवालच्या 602 सिग्नल यूनिट यांचाही सन्मान करण्यात येणार आहे.

विंग कमांडर अभिनंदन वर्तमान यांचे लढावू विमान पाकिस्तानच्या हद्दीत कोसळले होते. त्यानंतर पाक सैन्याने त्यांना दोन दिवस कैदेत ठेवले होते. भारताकडून त्यांच्या सुटकेसाठी केलेल्या प्रयत्नांनंतर 1 मार्चला पाकिस्तानने अभिनंदन वर्तमान यांची सुटका केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *