Jaimaharashtra news

बाळासाहेब थोरात यांची काँग्रेसच्या विधिमंडळ नेतेपदी निवड

लोकसभा निवडणुका झाल्यानंतर माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत सर्व पदांचा राजीनामा दिला होता. विधानसभा निवडणुकाही जवळ आल्याने काँग्रेसने पक्षांमध्ये काही बदल  करत विखे-पाटील यांचे प्रतिस्पर्धी बाळासाहेब थोरात यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे.तर विधानसभेच्या गटनेतेपदी विजय वडेट्टीवार यांची निवड केली आहे.

काँग्रेसने पक्षामध्ये बदल

माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी लोकसभा निवडणुका झाल्यानंतर काँग्रेसला सोडचिठ्ठी देत सर्व पदांचा राजीनामा दिला.

काँग्रेसने विखे-पाटील यांचे प्रतिस्पर्धी बाळासाहेब थोरात यांची काँग्रेसच्या विधिमंडळ नेतेपदी निवड केली आहे.

तर विधानसभेच्या गटनेतेपदी विजय वडेट्टीवार यांची निवड केली आहे.

या नियुक्त्या काँग्रेसचे सरचिटणीस के.सी. वेणूगोपाल यांनी जाहीर केल्या आहेत.

भाई जगताप यांची नियुक्ती विधान परिषदेच्या प्रतोदपदी करण्यात आली आहे.

विधानसभा उपनेतेपदाची जबाबदारी आमदार नसीम खान यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.

विधान परिषदेच्या गटनेतेपदी शरद रणपिसे यांची तर उपनेतेपदी रामहरी रुपनवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Exit mobile version