Thu. Sep 16th, 2021

परमबीर सिंग यांच्या परदेश दौऱ्यावर बंदी

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. मुंबई पोलिसांनी परमबीर सिंग यांच्या विरोधात शोध सूचना जारी केल्याने परमबीर सिंह यांची परदेशात जाण्याची नाकाबंदी करण्यात आली आहे. दिवसेंदिवस माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर कारवाईचा फास आवळत चालला आहे. त्यांच्या विरोधात आतापर्यंत ठाणे आणि मुंबई परिसरामध्ये चार गुन्ह्यांची नोंद करण्यात आलेली आहे. दरम्यान परमबीर सिंग मुंबईत नसल्याने मुंबई पोलिसांनी त्यांच्या विरोधात शोध सूचना जारी केली असून त्याची माहिती विमानतळ आदी ठिकाणी देण्यात आल्याचे सूत्रांची माहिती आहे. परमबीर सिंग यांनी देश सोडून बाहेर जाऊ नये, परदेशात जाऊ नये यासाठी ही शोध सूचना जारी केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *