Fri. Aug 6th, 2021

जाॅन्सन अ‌ॅड जॉन्सनच्या उत्पादनावर बंदी

राष्ट्रीय बाल अधिकार सरंक्षण आयोगाने बहुराष्ट्रीय कंपनी जाॅन्सन अ‌ॅड जॉन्सनला मोठा धक्का दिला आहे. जाॅन्सन अ‌ॅड जॉन्सनच्या सर्व वस्तूंच्या उत्पादनावर आयोगाकडून बंदी आणण्यात आली आहे. जॉन्सनचे प्रोडक्ट हे लहान मुलांसाठी घातक असल्याच्या अहवालानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. बेबी शॅम्पू आणि टालकम पावडरमध्ये कॅन्सर होण्यासाठी कारणीभूत असणारे  घटक असल्याचे निष्पन्न झाले आहे. ही उत्पादने बाजारातून हटवण्याचा आदेश देण्यात आले आहेत. या आधी सुद्दा या कंपनीला कारवाईला सामोरे जावे लागले होते.

नेमकं प्रकरण काय?

जॉन्सन अ‌ॅंड जॉन्सनच्या अनेक उत्पादने लहान मुलांच्या आरोग्यासाठी घातक असल्याचे समोर आले होते.

8 हजारपेक्षा अधिक लोकांनी या कंपनीविरोधात तक्रारी दाखल केल्या होत्या.

त्यामुळे याआधी सुद्धा कोट्यावधीचा फटका या कंपनीला बसला आहे.

राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाने यावर बंदी घालण्याचे पत्र राज्यातीव सचिवांना दिले आहे.

अमेरिकेतही या कंपनीवर बंदी घालण्यात आली आहे.

एस्बेस्टॉस हा त्यात आढळणारा पदार्थ लहान मुलांसाठी घातक असल्याचे स्पष्ट झाले आहे.

या पावडरीचा धोका मुलासोबत आईलाही होत असल्याचे सांगण्यात आलं आहे.

त्यामुळे ही उत्पादने बाजारातून हटवण्याचा आदेश देण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *