‘रझा अकादमीवर बंदी घाला, नाहीतर त्यांना कसे संपवायचे ते आम्ही बघू’ – नितेश राणे

त्रिपुरा हिंसाचार घटनेचे पडसाद राज्यात ठिकठिकाणी उमटले आहेत. तसचे रझा अकादमीने काढलेल्या मोर्चाने राज्यात हिंसक वळण घेतले. त्याविरोधात विरोधी पक्षनेते आक्रमक झाले आहेत. ‘राज्य सरकारने रझा अकादमीवर बंदी घालावी नाहीतर त्यांना कसे संपवायचे ते आम्ही येणाऱ्या दिवसांत बघू’, असा इशारा भाजप नेते नितेश राणे यांनी दिला आहे.
तसेच रझा अकादमीला भाजपचे पिल्लू म्हणणाऱ्या शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. नितेश राणे म्हणाले, संजय राऊत आणि शिवसेनेने आपला आत्मा सत्तेसाठी विकून टाकला आहे. त्यामुळे संजय राऊतांना मी बाळासाहेबांच्या भाषणाची सीडी पाठवणार आहे. बाळासाहेबांची ती भाषणे ऐकल्यावर संजय राऊतांना कळेल की शिवसेनेची मुख्य भूमिका काय होती, असा सल्ला नितेश राणे यांनी राऊतांना दिला. तसेच रझा अकादमी हे महाविकास आघाडीचे चौथे पिल्लू असल्याचा टोलाही त्यांनी लगावला आहे.
त्रिपुरा घटनेच्या विरोधात रझा अकादमीने राज्यात काढलेल्या मोर्च्याने हिंसक वळण घेतले. हिंदुंना दबावात आणण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला. त्यामुळे राज्य सरकारने रझा अकादमीवर लवकरात लवकर बंदी घालावी. नाहीतर त्यांना कसे संपवायचे ते आम्ही येणाऱ्या दिवसांत बघू असा इशारा नितेश राणे यांनी दिला आहे.