वांद्र्यात होणार साईदर्शन
जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
दरवर्षी प्रसिद्ध मंदिरांची हुबेहुब प्रतिकृती पाहण्याची संधी गणेशभक्तांना उपलब्ध करून देणारे वांद्रे परिसरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यावर्षी शिर्डीच्या साईबाबा मंदिराची प्रतिकृती
साकारली आहे.
साईबाबा समाधीच्या शताब्दी निमित्त साईबाबा समाधी मंदिराची हुबेहुब प्रतिकृती येथे उभारण्यात आली आहे. द्वारकामाई समवेत इतरही चलचित्रे हुबेहुब साकारण्यात आली आहेत. विशेष
म्हणजे आमदार आशिष शेलार या मंडळाचे प्रमुख सल्लागार आहेत. तर वांद्र्यातील साईदर्शनासाठी भाविकांची गर्दी वाढली आहे.