Jaimaharashtra news

#IPL2019 बंगळुरूची हैदराबादवर ४ गडी राखून मात

बंगळुरू आणि हैदराबाद यांच्यामध्ये झालेल्या सामन्यात बंगळुरूने विजय मिळवला आहे. बंगळुरूने हैदराबादवर ४ गडी आणि ४ चेंडू राखून मात केला आहे. सध्या प्ले ऑफ्ससाठी सामना सुरू असल्यामुळे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. मात्र बंगळुरूने हैदराबादचा पराभव केल्यामुळे हैदराबादचा आगामी सामना महत्वाचा ठरणार आहे. बंगळुरू संघाचा शिमरॉन हेटमायरने ७५ धावा करत बंगळुरूला विजय मिळवून दिला.

हैदराबादचा पराभव –

बंगळुरू आणि हैदराबादमध्ये शनिवारी सामना रंगला.

नाणेफेक जिंकून बंगळुरूने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

या सामन्यात बंगळुरूने हैदराबादवर मात करून विजय मिळवला आहे,

बंगळुरू संघाचा शिमरॉन हेटमायरने ७५ धावा केल्या तर गुरकीरत सिंगने ६५ धावा केल्या.

प्रथम फलंदाजी करत हैदराबादने १७५ धावांचे आव्हान दिले.

या आव्हानाचे पाठलाग करताना बंगळुरूची सुरुवात खराब झाली मात्र त्यानंतर शिमरॉन आणि गुरकीरतने विजय मिळवून दिला.

बंगळुरू संघाचे वॉशिंग्टन सुंदरने ३, नवदीप सैनीने २ तर युजवेंद्र चहल आणि कुलवंत खेजरोलिया यांनी प्रत्येकी १-१ बळी टिपले.

हैदराबादचा पराभव झाल्यामुळे त्यांना प्ले ऑफ्ससाठी मोठे कष्ट घ्यावे लागणार आहे.

Exit mobile version