Sun. May 16th, 2021

Under-19 World Cup 2020: वर्ल्ड कप स्पर्धेसाठी बांगलादेश टीम जाहीर

आयसीसी अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धा 2020 साली होणार आहे. या स्पर्धेसाठी बांगलादेश टीमची घोषणा करण्यात आली आहे.

बांगलादेश टीमचे नेतृत्व अकबर अलीकडे सोपवण्यात आलं आहे. तर ताहिद ह्रिदोय उपकर्णधार असणार आहे.

अशी आहे टीम बांगलादेश : अकबर अली (कॅप्टन), ताहिद ह्रिदोय, तनजीद हसन तनीम, मोहम्मद परवेज हुसेन, प्रनतीक नवरोस नबील, महमुदुल हसन जॉय, शहादत हुसेन, शमीन हुसेन, मोहम्मद मृत्युंजय, तंजीम हसन, अविषेक दास, शोरिफुल इस्लाम, मोहम्मद शाहीन, रकीबुल हसन आणि हसन मोराद

या वर्ल्ड कप स्पर्धेचं आयोजन दक्षिण आफ्रिकेत करण्यात आलं आहे. यंदाची ही 13 वी वर्ल्ड कप स्पर्धा आहे.

हे ही वाचा : वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा

अंडर-19 वर्ल्ड कप स्पर्धा 17 जानेवारी 2020 पासून सुरु होत आहे.

वर्ल्ड कप स्पर्धेत आतापर्यंत टीम इंडिया सर्वात यशस्वी ठरली आहे. टीम इंडियाने 4 वेळा अंडर -19 वर्ल्ड कप जिंकला आहे.

अंडर-19 वर्ल्ड कप स्पर्धेत एकूण 16 टीम सहभागी होणार आहेत. या 16 टीम एकूण 4 गृपमध्ये विभागल्या आहेत.

बांगलादेशला सी गृपमध्ये ठेवण्यात आलं आहेत. प्रत्येक गृपमधील टॉप-2 टीम पुढील टप्प्यात प्रवेश करतील.

टीम बांगलादेशचे वर्ल्ड कपमधील सामने

13 जानेवारी : बांगलादेश विरुद्ध ऑस्ट्रेलिया.

15 जानेवारी : बांगलादेश विरुद्ध न्यूझीलंड.

18 जानेवारी : बांगलादेश विरुद्ध झिंबाब्वे.

21 जानेवारी : बांगलादेश विरुद्ध स्कॉटलंड.

24 जानेवारी : बांगलादेश विरुद्ध पाकिस्तान.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *