Sat. May 25th, 2019

बँक मॅनेजरचा मोलकरणीवर बलात्कार, 7 वर्षांची कैद!

0Shares

घरी कामाला असणाऱ्या मोलकरणीवर बलात्कार केल्याप्रकरणी एका राष्ट्रीयकृत बँकेच्या मॅनेजरला अटक करण्यात आली आहे. त्याला 1 लाख रुपये दंड आणि 7 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

काय घडलं नेमकं?

एका राष्ट्रीयकृत बँकेतील मॅनेजरने 2013 साली आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप महिलेने केला होता.

52 वर्षीय मॅनेजरकडे पीडित महिला 2 वर्षांपासून कामाला होती.

मात्र मॅनेजरची दुसऱ्या शहरात बदली झाल्यावर तिच्या कामाचा प्रश्न निर्माण झाला.

त्यावर तिला मॅनेजरने आपण जाणार असलेल्या शहरात बोलावून तिथे कामाचं आश्वासन दिलं.

मात्र तिकडे गेल्यावर मॅनेजरने तिच्यावर बलात्कार केला. तसंच पैसे देऊन पुन्हा मुंबईला जाण्यास सांगितलं.

मुंबईला परतल्यावर पीडितेने पोलीस तक्रार केली.

वैद्यकीय अहवाल, बिल्डिंगच्या चौकीदाराची साक्ष यांमुळे मॅनेजरवरील गुन्हा सिद्ध झाला.

अखेर बँक मॅनेजरला 7 वर्षांची कैद आणि 1 लाख रुपये दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *