Sun. Oct 24th, 2021

बँकांचे कामाचे तास कमी होणार

देशात कोरोना रुग्णांचा आकडा हा वाढतच असल्याचं दिसत आहे. देशात बुधवारी कोरोनाचे 2,67,334 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 4529 जणांचा मृत्यू झाला. याच पार्श्वभूमीवर बँकांनी त्यांचे कामाचे तास कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाच्या कठीण काळात बँक कर्मचारी लोकांची सेवा करत आहेत. अशा परिस्थितीत सरकारी बँकांव्यतिरिक्त आपल्या कर्मचार्‍यांचे जीव वाचवण्यासाठी खासगी क्षेत्रातील बँकांनीही काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.

बहुतेक बँकांनी आपल्या कामकाजाचे तास सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत मर्यादित केले आहेत. लोकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही हे लक्षात घेऊन बँका मुख्यत्वे पैसे जमा करण्याचे आणि पैसे काढण्याचे काम करत आहेत. याशिवाय शासकीय काम आणि रेमिटेन्स सेवाही सुरू आहे.

एका ग्राहकाने ट्विटरवर स्टेट बँक ऑफ इंडियाला डीबीटी अकाऊंट लिंक करण्यासाठी ऑनलाईन सेवा सुरू करण्यास सांगितले. यावर एसबीआयने उत्तर दिले की, एसएलबीसीच्या सूचनेनुसार बँकेच्या शाखा सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत कार्यरत आहेत. यावेळी बँकेच्या शाखेत केवळ चार सेवा सुरू आहेत. यात पैसे जमा करणे, पैसे काढणे, चेक जमा करणं, ड्राफ्ट/आरटीजीएस/एनईएफटी आणि सरकारी सेवेचा समावेश आहे.

पैसे ठेवणे आणि पैसे काढणे
चेकशी संबंधित काम
डिमांड ड्राफ्ट/आरटीजीएस/एनईएफटीशी संबंधित काम
शासकीय चलन

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *