Wed. May 22nd, 2019

आजच उरकून घ्या बॅंकेचे व्यवहार, उद्यापासून 5 दिवस बॅंका बंद

0Shares

बँक कर्मचाऱ्यांच्या मागण्यासाठी ऑल इंडिया बँक ऑफिसर कन्फडरेशनने उद्यापासून संप पुकारण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या 20 डिसेंबरनंतर बँका 5 दिवस बंद राहणार असल्याने 20 तारखेच्या आधीच आपण बँकांमधील कामे आटोपून घ्यावीत. या संपामुळे 21 ते 26 डिसेंबरच्या काळात बँका बंद ठेवण्यात येणार आहेत.

हा संप केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात पुकारला जात असून, बँक ऑफ बडोदा, देना बँक व विजया बँक यांच्या विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून सरकारला धारेवर धरण्यात येणार आहे. तसेच कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीचा मुद्दाही या संपाच्या केंद्रस्थानी असणार आहे.

21 डिसेंबरला शुक्रवार असून, त्याच दिवसापासून बँकांनी संपाची घोषणा केली आहे. 22 आणि 23 डिसेंबरला शनिवार, रविवार असल्याने बँकांना सुट्टीच राहणार आहे. तसेच 25 डिसेंबरला ख्रिसमसची सुट्टी असल्याने बँका बंद राहणार आहेत. तर 26 डिसेंबरपासून युनायटेड फोरमने पुन्हा एकदा संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *