Jaimaharashtra news

15 दिवसात कर्जमाफी प्रकरण पूर्ण करा – उद्धव ठाकरे

पीकविम्याच्या मुद्यावरून शिवसेनेने आज पीकाविमा कंपनी आणि बॅंकांविरोधात इशारा मोर्चा काढला होता. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या हक्कासाठी मोर्चा काढत असल्याचे म्हटलं आहे. तसेच 15 दिवसात कर्जमाफी प्रकरण पूर्ण झाले पाहिजे असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. आम्हाला आक्रमक व्हायला लावू नका नाहीतर मोर्चा काढू असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.

काय म्हणाले उद्धव ठाकरे ?

शेतकऱ्यांना हक्क मिळावा म्हणून शिवसेनेचा मोर्चा असल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

सरकार कोणाचाही असो, आम्हाला माणुसकी महत्त्वाची, आम्ही माणुसकी माणणारे लोकं आहोत.

कोणाच्याही टीकेला भीक घालत नसल्याचे म्हणाले आहे.

शेतकऱ्यांची फसवणूक करू नये असेही आवाहन उद्धव ठाकरे यांनी दिले आहे.

बीकेसीत शिवसेनेच्या पीकविमा मोर्चाची सांगता झाल्यानंतर उपस्थितांना संबोधित करताना ते बोलत होते.

 

 

Exit mobile version